esakal | 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे'; राहुल गांधींचा ‘म्हणी’तून भाजपवर निशाणा!

बोलून बातमी शोधा

Modi_Gandhi

अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या मालमत्तेवर काल प्राप्तीकर खात्याने छापे घातल्याने राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. तापसी पन्नू आणि कश्यप हे वेगवेगळ्या मुद्द्यावर स्पष्टपणे मत मांडण्यासाठी ओळखले जातात.

'खिसियानी बिल्ली खंबा नोचे'; राहुल गांधींचा ‘म्हणी’तून भाजपवर निशाणा!

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली : शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यावर प्राप्तीकर खात्याने घातलेल्या छाप्यावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला धारेवर धरले आहे. राहुल यांनी हिंदी म्हणीचा उल्लेख करत केंद्रावर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी तीन म्हणीचा उल्लेख केला आहे. उंगलियो पे नचाना, भिगी बिल्ली बनना आणि खिसियानी बिल्ली खंबा नोचे याचा समावेश आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, उंगलियो पर नचाना म्हणजे केंद्र सरकारचे आयटी, ईडी, सीबीआयसमवेतचे वर्तन, भीगी बिल्ली म्हणजे केंद्र सरकारसमोर मित्र मीडिया आणि खिसियानी बिल्ली म्हणजे केंद्र सरकारकडून शेतकरी समर्थकांवर टाकण्यात येणारे छापे.

EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स​

या म्हणींच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी भाजपच्या धोरणावर टीका केली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या मालमत्तेवर काल प्राप्तीकर खात्याने छापे घातल्याने राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. तापसी पन्नू आणि कश्यप हे वेगवेगळ्या मुद्द्यावर स्पष्टपणे मत मांडण्यासाठी ओळखले जातात.

जावडेकर यांचे प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को, उंगलियो पर गिने जा सकना आणि रंगा सियार अशा म्हणीचा उल्लेख करत कॉंग्रेसवर टीका केली आहे. जावडेकर यांनी म्हणीचा असा वापर केला आहे.

बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार

सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को, म्हणजे आणीबाणीच्या काळात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवणाऱ्या कॉंग्रेसकडून माध्यम स्वातंत्र्यावर ज्ञान देणे, उंगली पर गिने जा सकना म्हणजे कॉंग्रेसची सध्याची स्थिती आणि निवडणुकीतील स्थिती. आणि शेवटचे रंगा सियार म्हणजे सर्वात जातीयवादी पक्षाचे धर्मनिरपेक्षतेचे सोंग. एकाच कुटुंबाभोवती मर्यादित असलेल्या पक्षाकडून लोकशाहीचा शिकवला जाणारा पाठ. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले की, मोदी सरकारने सर्व तपास यंत्रणांना मोकळीक दिली असून कोणताही बॉलिवूड स्टार हा त्यांच्या दृष्टीने सेलिब्रिटी नाही.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)