पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने केला 340 कोटींचा चुराडा; काँग्रेसही कमी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Expenditure

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने केला 340 कोटींचा चुराडा; काँग्रेसही कमी नाही

भाजपने या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 340 कोटी रुपये खर्च केले आहेत. भाजपने सर्वाधिक खर्च यूपीमध्ये झालेल्या निवडणूकीत खर्च केला. तर काँग्रेसने याच राज्यांमध्ये प्रचारावर 194 कोटी रुपयांहून अधिक रूपये खर्च केला. ही माहिती दोन्ही प्रमुख पक्षांच्या निवडणूक खर्चाच्या अहवालात देण्यात आली आहे.

भाजपने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आणि सार्वजनिक केलेल्या अहवालानुसार, पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी एकूण 340 कोटी रुपये खर्च केले. भाजपच्या निवडणूक खर्चाच्या अहवालानुसार, यूपीमध्ये सर्वाधिक 221 कोटी रुपये, मणिपूरमध्ये 23 कोटी रुपये, उत्तराखंडमध्ये 43.67 कोटी रुपये, पंजाबमध्ये 36 कोटी रुपये आणि गोव्यात 19 कोटी रुपये खर्च केले आहेत.

हेही वाचा: Congress : मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता!

तसेच काँग्रेसने दाखल केलेल्या अहवालात वरील पाच राज्यांच्या निवडणुका आणि संबंधित कामांसाठी 194 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या पक्षांनी त्यांचा निवडणूक खर्चाचा अहवाल मुदतीत निवडणूक आयोगासमोर सादर करणे आवश्यक आसते.

Web Title: Bjp Congress Poll Expenditure State Elections Rahul Gandhi Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..