मेहबूबा यांना सवाल करीत भाजपचा उलटवार; हिंदू मुख्यमंत्री स्वीकारणार?

मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक हिंदू मुख्यमंत्री स्वीकारतील का?
BJP counterattack questioning Mehbooba Will Hindu Chief Minister accept politics
BJP counterattack questioning Mehbooba Will Hindu Chief Minister accept politics sakal

नवी दिल्ली : मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक हिंदू मुख्यमंत्री स्वीकारतील का, असा थेट सवाल भाजपने केला आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यावर मोदी सरकारच्या ‘एनआरसी’ आणि ‘सीएए‘ यांसारख्या कायद्यांचा उपरोधिक उल्लेख मेहबूबा यांनी केला होता. यामुळे भाजपने आपल्या एकेकाळच्या सहकारी राहिलेल्या या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यावर वरील सवालासह उलटवार केला.

यानिमित्ताने भाजपने ‘यूपीए‘ सरकारच्या काळात दहा वर्षे पंतप्रधानपदी राहिलेले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार निशाण्यावर राहिलेले डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीचाही उल्लेख केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुफ्ती यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की ''भारतीय वंशाचे सक्षम नेते ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होत आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल आपण सर्वांनी त्यांचे कौतुक केले पाहिजे. मात्र काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे.''

मुफ्ती यांनी सुनक यांचे अभिनंदन करताना म्हटले होते की, ‘सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान असतील हा अभिमानाचा क्षण आहे. अल्पसंख्याक असलेल्या सुनक यांना ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनवले जात आहे. भारतात मात्र आम्ही अजूनही ‘एनआरसी‘ आणि ‘सीएए‘ सारख्या विभाजनकारी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांनी बांधील आहोत.‘

यामुळे संतप्त झालेल्या भाजपने तत्कालीन कायदेमंत्री प्रसाद यांना मैदानात उतरविले. प्रसाद यांनी पाठोपाठ एक ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की, मेहबुबा मुफ्तीजी, तुम्ही जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याकांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदी स्वीकाराल का? ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर काही नेते बहुसंख्यवादाच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. मी त्यांना माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या `असाधारण'' कारकिर्दीची आठवण करून देऊ इच्छितो. सध्या आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू आमच्या राष्ट्रपती आहेत हा अभिमानास्पद क्षण आहे.‘

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com