
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे देश शोकाकुल असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विदेशात मौजमजा करण्यासाठी जात असल्याची टीका भाजपकडून सोमवारी करण्यात आली. सुटी साजरी करण्यासाठी राहुल गांधी हे व्हिएतनामला जाणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर त्याचा संदर्भ देत भाजपने गांधी यांच्यावर टीका केली आहे.