esakal | आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या
sakal

बोलून बातमी शोधा

आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्यातील भाजप कार्यकर्त्याची संख्या इतकी आहे की त्यांनी नुसतं थुंकलं तरीही छत्तीसगडचे सरकार वाहून जाईल, असं वादग्रस्त वक्तव्य छत्तीसगडच्या भाजप सरचिटणीस डी पुरंदेश्वरी यांनी केलं. छत्तीसगडचे काँग्रेस मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि मंत्रिमंडळावर टीकास्त्र सोडताना डी पुरंदेश्वरी यांनी वाद ओढावून घेतला. गुरुवारी छत्तीसगडमध्ये भाजपची बैठक पार पडली. यामध्ये मिशन 2023 ची तयारी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना डी पुरंदेश्वरी यांची जीभ घसरली. डी पुरंदेश्वरी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी प्रत्त्युत्तर दिलेय.

बस्तर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या चिंतन शिबीर कार्यक्रमात डी पुरंदेश्वरी बोलत होत्या. यावेळी डी पुरंदेश्वरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना केली. यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडताना आदिवसांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला.

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

भुपेश बघेल सरकारवर टीका करताना डी पुरंदेश्वरी यांची जीभ घसरली. त्या म्हणाल्या की, 'सत्ताधारी पक्षाला छत्तीसगडमधील जनता योग्य ते उत्तर देईल. तुम्ही सर्वांनी संकल्प करुन काम करा. 2023 मधील निवडणुकीत आपलाच विजय होणार आहे. आपले कार्यकर्ते इतके आहेत की त्यांनी मागे वळून नुसतं थुंकलं तरी मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ वाहून जाईल.'

पाहा व्हिडिओ -

हेही वाचा: शाळा कधी सुरु होणार?, अजित पवारांनी दिलं उत्तर

डी पुरंदेश्वरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय स्तरातून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी डी पुरंदेश्वरी यांना आपल्या शब्दात प्रतिक्रया दिली आहे. ते म्हणाले की, 'डी पुरंदेश्वरी यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. पण जर कुणी आकाशात थुंकलं तर ते त्यांच्या चेहऱ्यावर पडतं .'

loading image
go to top