esakal | शाळा कधी सुरु होणार?, अजित पवारांनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा कधी सुरु होणार?, अजित पवारांनी दिलं उत्तर

शाळा कधी सुरु होणार?, अजित पवारांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Schools Reopen : कोरोनाची दुसरी लाट थंडावल्यानंतर अनेक राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही शाळा कधी सुरु होणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शाळांबाबात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश झारखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण महाराष्ट्राने अद्याप वेट अण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा: खडसे, राजू शेट्टींचा पत्ता कट?, राज्यपालांचा नावांना आक्षेप

देशामध्ये काही राज्यात शाळा सुरु केल्यानंतर त्याठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शालेय कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. यासंदर्भात टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा: अनिल देशमुख प्रकरण: CBI ने आपल्याच आधिकाऱ्याला केली अटक

कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. कोरोनाच्या काळात शाळेपासून महाविद्यालयापर्यंत दरवाजे बंद आहेत. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. मात्र शाळा कधी सुरु होणार? याकडे पालकांचे लक्ष लागलं आहे. लहान मुलांसाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे राज्य सरकारने तुर्तास वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा: भय इथलं संपत नाय; कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट, लसही अप्रभावी

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गावं यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करतील तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून ते पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर पावसानंतर भूस्खलन झाल्याने रस्तावर मोठे दगड आले आहेत. पीडब्लूडी शर्थीने वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. दगड बाजूला काढण्यासाठी ज्या काही साधनांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

loading image
go to top