
नवी दिल्ली : निवडणूक आयोगावरील मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आज भाजपने निवडणूक आयोगाची पाठराखण केली. ‘‘प्रत्येक पराभवानंतर काँग्रेसकडून नवे बहाणे शोधले गेले आहेत. आता बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने काँग्रेस पक्ष खोटे आरोप करण्यात गुंतला आहे,’’ असा आरोप भाजप प्रवक्ते अनुराग ठाकूर यांनी केला.