"भाजपने रामविलास पासवानांचा राजकीय वारसा संपवला"

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 11 November 2020

भाजपवर दिवंगत रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा संपवल्याचा आरोप करण्यात आलाय.

भोपाळ- भाजपने बिहारमध्ये आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी केलेली असताना कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मात्र भाजपवर टीका केली आहे. त्यांनी भाजपवर दिवंगत रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा संपवल्याचा आरोप केला. त्याचवेळी भाजपने कुटनितीचे राजकारण करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांची राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न केला, असेही दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश पोटनिवडणूक आणि बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, नितीशकुमार जी, बिहार आपल्यसाठी लहान झाला आहे. आपण राष्ट्रीय राजकारणात जायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांना मदत करा. आरएसएसच्या इंग्रजांप्रमाणे फूट पाडा आणि राजकारण करा, या धोरणाला थारा देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. या वेळी दिग्विजयसिंह यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या चांगल्या कामगिरीबद्धल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. 

भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला; मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई

सिंह यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबतही मत मांडले आहे. ते म्हणाले, की आज देशात विचारसरणीच्या आधारे संघर्ष करणारे राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत. राजकारण विचारातून केले जाते, हे एनडीएच्या घटक पक्षांनी समजून घेतले पाहिजे. एखादी व्यक्ती जर राजकीय महत्त्वकांक्षेपोटी विचारांना तिलांजली देऊन आपल्या स्वार्थासाठी तडजोडी करत असेल तर तो अधिक काळ राजकारणात टिकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp end ramwilas paswan political era