esakal | भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला; मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

esakal.

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान अखेर भारताच्या दबावासमोर झूकले आहेत.

भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला; मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान अखेर भारताच्या दबावासमोर झूकले आहेत. भारताच्या डावपेचांमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिशेने पुढाकार घेतलाय. पाकिस्तानच्या एआयए तपास यंत्रणेने मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या 11 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे नाव नव्या यादीमध्ये घेतले आहे. यवढेच नाही तर, या दहशतवाद्यांचे ठिकाण सांगणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.  

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवला होता मुंबई हल्ला

26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी लष्कर आणि गुफ्तचर संस्थेच्या पाठिंब्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हल्ले घडवून आणले होते. या हल्ल्यामध्ये विदेशी नागरिकांसह 155 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एनएसजी टीमने ऑपरेशन ब्लॅक टॉरनेडो लॉन्च करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या हल्ल्याचा मास्टर माईंड जकीउर रहमान लखवी आहे, पाकिस्तानने याला अटक केली, पण पुन्हा त्याची सुटका केली होती. 

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

जागतिक मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला पैसा पुरवल्याप्रकरणी फाईनेंशियल अॅक्शन टास्क फोर्समधील भारताच्या डावपेचांमुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. मागील महिन्यात एफएटीएफच्या बैठकीत पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई न केल्याप्रकरणी ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एफएटीएफने म्हटलं होतं की, पाकिस्तानने आतापर्यंत आम्ही सांगितलेल्या 27 कार्ययोजनांपैकी केवळ 21 च पूर्ण केल्या आहेत. यामध्ये दहशतवादी मौलाना मसूद अजहर आणि हाफिज सईदवर कारवाई न करण्याचाही समावेश होता. 

पाकिस्तान स्वत:ला ग्रे लिस्टमधून बाहेर काढू पाहात आहे. त्यासाठी त्याला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावे लागेल. किंवा तसं करत असल्याचे जगाला दाखवावे तरी लागेल. त्यामुळेच पाकिस्तानने दहशतवाद्यांना मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये टाकले आहे. पाकिस्तान ग्रे यादीमध्ये असल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि यूरोपीय संघाकडून मदत मिळणे बंद होईल. त्यामुळे अधिच कंगाल असलेला पाकिस्तान आर्थिक संकटात सापडेल.  

loading image