
उन्नावमध्ये एका युवतीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले हेते. तसेच 25 लाख रूपयांची नुकसान भरपाई सेंगरला पिडितेच्या कुटुंबाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नवी दिल्ली : भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दिल्लीतील तिसहजारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. उन्नावमध्ये एका युवतीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले हेते. तसेच 25 लाख रूपयांची नुकसान भरपाई सेंगरला पिडितेच्या कुटुंबाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
2017 Unnao rape case: BJP expelled MLA Kuldeep Singh Sengar sentenced to life imprisonment by Delhi's Tis Hazari Court pic.twitter.com/SqBcCmzjdc
— ANI (@ANI) December 20, 2019
सेंगर याने पहिले संबंधित मुलीचे अपहरण केले व नंतर तिच्यावर बलात्कार केला. घटना घडली तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. न्यायालयाने 9 ऑगस्टला त्याच्याविरुद्ध गुन्हे निश्चित केले होते. अखेर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दिल्लीत तणाव, जामा मस्जिद परिसरात जमाव एकवटला
2017 Unnao rape case: Delhi's Tis Hazari Court has also ordered BJP expelled MLA Kuldeep Singh Sengar to pay a compensation of Rs. 25 lakhs to the victim https://t.co/xfaVVsOG0X
— ANI (@ANI) December 20, 2019
उन्नावमधील ही बलात्काराची घटना 2017मध्ये घडली होती. या प्रकरणाची सुनावणी या वर्षी पाच ऑगस्टपासून दररोज घेण्यात येत होती. मुळात हा खटला लखनौमध्ये दाखल करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला दिल्लीला वर्ग करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणी झालेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवत केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) दिरंगाई केल्याबद्दल फटकारले होते.
विरोधी पक्षांकडून भाजपवर या प्रकरणी टीका करण्यात आल्यानंतर भाजपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.