
नवी दिल्ली : संसद भवनाच्या आवारात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रतापचंद्र सरंगी आणि मुकेश राजपूत यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात भाजपकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच आता भाजपकडून त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीसही देण्यात आली आहे.