भाजपला ‘टेरर फंडिंग’कडून देणग्या?

वृत्तसंस्था
Saturday, 23 November 2019

दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी ज्या कंपन्यांची (टेरर फंडिंग) चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत आहे, त्याच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाने देणग्या घेतल्याची माहिती उघड झाली.

नवी दिल्ली - दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी ज्या कंपन्यांची (टेरर फंडिंग) चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत आहे, त्याच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाने देणग्या घेतल्याची माहिती उघड झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या आर्थिक माहितीत भाजपनेच ही बाब जाहीर केल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे, की निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार ‘आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेड’ नावाच्या कंपनीने सत्ताधारी भाजपला मोठा निधी दिला आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटातील आरोपी आणि कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा हस्तक इक्‍बाल मेनन ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याची मालमत्ता खरेदी करणे आणि त्याच्याशी व्यवहार केल्याबद्दल ‘आरकेडब्ल्यू’ची चौकशी ‘ईडी’ करीत आहे. दिवाळखोरीत निघालेल्या ‘दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ (डीएचएफएल) या कंपनीशी संबंधित असलेल्या ‘आरकेडब्ल्यू’ने भाजपला २०१४-१५मध्ये दहा कोटी रुपयांची देणगी दिली होती. अन्य एका वृत्तसंस्थेने ही बाब जानेवारी महिन्यात उडकीस आणली होती, असे सांगण्यात आले.

राज कुंद्रांचीही चौकशी
बिंद्रा हा इक्‍बाल मिर्ची आणि कंपन्यांसाठी सौदे करणारा दलाल असल्याचे ‘ईडी’च्या हवाल्यावरून सांगण्यात येते. ‘आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स’च्या व्यवहाराबाबत प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांची चौकशी ‘ईडी’ने केली होती. शिल्पा शेट्टी ही ‘इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी’ या कंपनीची संचालक होती. या कंपनीने ‘आरकेडब्ल्यू’शी व्यवहार केला होता.

भाजपला देणग्या (कोटी रुपयांत)
१० आरकेडब्ल्यू  डेव्हलपर्स लिमिटेड
२  सनब्लिंक  रियल इस्टेट 
७.५ दर्शन  डेव्हलपर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Funding