गोव्यात भाजप सरकार पडणार? (व्हिडिओ)

शुक्रवार, 18 जानेवारी 2019

गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. 

पणजी- गोव्यातले भाजपचे सरकार कधीही पडू शकते, कारण; सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या गोमंतकवादी पक्षाच्या जोरावर हे सरकार आहे, तोच तोच पक्ष आता सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. 

शिरोडा आणि मांद्रे या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून भाजप आणि गोमंतकवादी पक्ष आमने सामने आले आहेत. दोन काँग्रेस आमदारांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दोन्ही रिक्त जागांवर पोटनिवडमुक लढवून आपलं बळ वाढवण्याचा भाजप आणि गोमंतकवादी पक्षाचा प्रयत्न आहे. यावरूनच दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. यामुळे भाजप युतीचे गोव्यातील सरकार पडण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. 

गोमंतकवादी पक्ष जर सत्तेतून बाहेर पडले तर काँग्रेस गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहील, कारण गोवा विधानसभेत सर्वाधिका जागा असलेला पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Government will fall in Goa?