भाजप अजूनही आशावादी; रजनीकांत NDA ला साथ देतील असा विश्वास

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

काही आठवड्यांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली होती. 31 डिसेंबरला पक्षाची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. पण...

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांनी यातून यूटर्न घेतला आहे. खुद्द रजनीकांत यांनी राजकीय मैदानात उतरणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. निर्णय बदलल्यामुळे त्यांनी आपल्या चाहत्यांची माफीही मागितली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर भाजपला अजूनही त्यांची साथ मिळण्याची आस दिसते. तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीत रजनीकांत  राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला साथ देतील, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. 

'द हिंदू'च्या वृत्तानुसार तामिळनाडूचे भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी यांनी राज्यातील आगामी निवडणुकीत रजनीकांत घटक पक्षाला साथ देतील, असे म्हटले आहे. राजकीय पक्ष काढण्याची बदललेली भूमिका ही रजनीकांत यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो.  या निर्णयानंतर आगामी निवडणुकीत ते एनडीएला पाठिंबा देतील, असा विश्वास सी. टी. रवी यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांतजी स्वत: राजकीय पक्ष काढणार नाहीत, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु देश आणि तामिळनाडू राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी ते एनडीएला नक्की पाठिंबा देतील, असे ते म्हणाले.  

"आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा", संजय राऊत आक्रमक

काही आठवड्यांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली होती. 31 डिसेंबरला पक्षाची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. पण मागील आठवड्यात प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरच त्यांनी मंगळवारी आपला निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.  रजनीकां यांनी यापूर्वी रजनी मक्कल मंद्रम(आरएमएम) ही संघटना काढली होती. याच संघटनेचे रुपांतर ते राजकारणात प्रवेश करण्यासाठी करणार होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP hopes Rajinikanth will back NDA Tamil Nadu