esakal | Chhattisgarh: "फोडा फोडीचे राजकारण करणारा भाजप म्हणजे देसी अंग्रेज"
sakal

बोलून बातमी शोधा

Brihaspat Singh

"फोडा फोडीचे राजकारण करणारा भाजप देसी अंग्रेज"

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर आता छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचाली सुरू असल्याचे दिसते आहे. भाजपने देशातील अनेक ठिकाणी असलेल्या काँग्रेस सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप छत्तीसगचे आमदार बृहस्पत सिंह (Brihaspat Singh) यांनी केलाय. भाजप भुपेश बघेल सरकारला अस्थिर करण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री टीएस सिंह देव यांना भडकवत असल्याचा आरोप यावेळी बृहस्पत सिंह यांनी केला.

भाजपने अनेक राज्यांतील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप छत्तीसगडचे काँग्रेसचे आमदार बृहस्पत सिंह यांनी भाजपवर केला. भाजपने फोडा आणि राज्य करा धोरण स्वीकारले आहे, म्हणूनच त्यांना 'देसी आंग्रेज' असल्याचे म्हटले जाते असे वक्तव्य केले बृहस्पत सिंह यांनी केले आहे. "छत्तीसगढमध्ये भाजपला 'देसी अंग्रेज' म्हटले जाते. आरएसएस कार्यकर्ते आमच्या आमदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये त्यांनी आमच्या सरकारला लक्ष्य केले असे म्हणत भाजपने फोडा आणि राज्य करा असे धोरण स्विकारले असल्याचा आरोप सिंह यांनी केला. "आरएसएस कार्यकर्त्यांनी यापूर्वीही छत्तीसगड सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. आता ते टीएस सिंह देव यांना भडकवत आहेत. मात्र टीए सिंह देव हे एक बुद्धिमान आणि समजूतदार नेते आहेत, ते भाजपच्या षड्यंत्राला बळी पडणार नाहीत," असे देखील काँग्रेस आमदार बृहस्पत सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा: ममता जिंकल्या असतील पण 'मॅन ऑफ द मॅच' मीच

दरम्यान, छत्तीसगड काँग्रेस सध्या दोन गटांमध्ये विभाजित झाल्याची चर्चा सुरू असताना बृहस्पत सिंह यांनी हे वक्तव्य केले. त्यातील एक गट मुख्यमंत्री बघेल आणि दुसरा आरोग्य मंत्री देव यांचा असल्याचे सांगितले जाते आहे.

loading image
go to top