Arun Yadav I इस्लामविरोधी टि्वट करणं भोवल, भाजपच्या IT प्रभारीची पक्षातून हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IT Cell chief arun yadav

यादव यांनी २०१७ मध्ये हे टि्वट केलं होतं, त्यानंतर भाजपने ही कारवाई केली आहे

इस्लामविरोधी टि्वट करणं भोवल, भाजपच्या IT प्रभारीची पक्षातून हकालपट्टी

भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी केली होती. मागील महिन्यात या दोघांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. दरम्यान, आता इस्लामविरोधी टि्वट केल्याप्रकरणी भाजपने (bjp) हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव (arun yadav) यांची पक्षातून हकालपट्टी केली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (IT Cell chief arun yadav)

हेही वाचा: 'शिंदे, फडणवीसांनी सरकार बनवण्यासाठी घेतलेली संधी जगजाहीर'

हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असून सध्या 'अरुण यादव यांना अटक करा,' असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. यादव यांनी २०१७ मध्ये हे टि्वट केलं होतं, त्यानंतर भाजपने ही कारवाई केली आहे. त्यामुळे नुपूर शर्मा प्रकरणानंतर आता हेही प्रकरण भाजपच्या अगंलट येणार का? अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, हरियाणा भाजपने प्रसिद्ध पत्रक काढून यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केलं आहे. प्रदेशाध्यक्ष ओपी धनख़ड यांनी ही माहिती दिली. मात्र, याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. यादव यांच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ऑल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद झुबेर यांना जर अशाच एका टि्वटसाठी अटक केली जाऊ शकते, तर अरुण यादव आणि नुपूर शर्मा यांच्या प्रकरणी पोलिस कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत.

हेही वाचा: TV न्यूज अँकर रोहित रंजनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Web Title: Bjp It Cell Chief Of Haryana Arun Yadav Removed From Party Controversial Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top