Rohit Ranjan I TV न्यूज अँकर रोहित रंजनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Rajank latest news supreme court

TV न्यूज अँकर रोहित रंजनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा चुकीचा व्हिडिओ चालवल्याबद्दल दोन टीव्ही न्यूज अॅंकर रोहित रंजन यांना ताब्यात घेण्यासाठी छत्तीसगढ आणि युपी पोलिस आमनेसामने आले होते. दोन दिवसांपूर्वी रंजन यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भाजपच्या काही नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढणारे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. यावरून हा वाद चिघळला होता. दरम्यान, आज निवेदक रोहित रंजनला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. (Rohit Rajank latest news supreme court)

रंजन यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात अधिकार्‍यांना कोणतीही जबरदस्तीचे निर्णय घेऊ नयेत असे निर्देश न्यायायलाने दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी दंडात्मक कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी रोहित रंजन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली आहे. याचिकेत रंजन यांनी म्हटंल होत की, संबंधित राज्यांमध्ये नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यात यावा. अथवा हे एफआयआर संलग्न करून तपास आणि सुनावणीसाठी एकाच ठिकाणी हस्तांतरित करण्यात यावा.

हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचनेचा 'मविआ'चा निर्णय रद्द करा - बावनकुळे

रोहित रंजनचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी गुरुवारी पुन्हा एकदा न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि जेके महेश्वरी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी सुनावणीची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणाची यादी करण्यासाठी सरन्यायाधीशांची परवानगी लागणार आहे. आतापर्यंत सीजेआयने हे प्रकरण सुनावणीसाठी कोणत्याही खंडपीठाकडे पाठवलेले नाही, असं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

काय आहे घटना?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधाने 'चुकीच्या संदर्भात' दाखवणारी बातमी प्रसारित केल्याबद्दल टीव्ही अँकर रोहित रंजनला त्याच्या घरातून अटक करण्यासाठी छत्तीसगड पोलिसांचे एक पथक मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे पोहोचले. यावेळी नोएडा पोलिसांनी रंजक यांना अटक केली. त्याच रात्री त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. केरळमध्ये काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत राहुल गांधी यांनी विधान केलं होतं. हे वक्तव्य उदयपूरमधील कन्हैया लाल हत्याकांड प्रकरणाशी जोडून त्याचा विपर्यास करण्यात आला होता.

हेही वाचा: शिवसेनेच्या नव्या पक्ष चिन्हाबाबत संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Sc Grants Relief To Tv News Anchor Rohit Ranjan Authorities Not To Take Any Coercive Steps Against Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..