भाजपच्या विजयामुळे निराश झालेले लोक हिंसाचार घडवतात : जे. पी. नड्डा

J P Nadda Twitter Account Hacked
J P Nadda Twitter Account HackedE sakal

बंगळुरू : रामनवमी आणि हनुमान जयंतीला झालेला हिंसाचार (Hanuman Violence) म्हणजे सामाजिक शांतता भंग करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. काँग्रेस (Congress) अतिशय वाईट पद्धतीने काम करतेय, असे आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी केले. तसेच हिंसाचाराचा संबंध पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासोबत जोडला. हे कर्नाटकातील हॉस्पेट येथे बोलत होते.

J P Nadda Twitter Account Hacked
हनुमान जयंतीला ३ राज्यात हिंसाचार; मंदिरावर हल्ला, दगडफेकीत पोलिस जखमी

"उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक जनादेशाने काही लोकांना धक्का बसला आहे. त्यामुळे हताश होऊन त्यांनी सामाजिक शांतता भंग करण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे हनुमान जयंती आणि रामनवमीच्या वेळी मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत.'', असं जे. पी. नड्डा म्हणाले.

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, राज्यातील तत्कालीन सिद्धरामय्या सरकारने पीएफआय सदस्यांची सुटका केली होती. पीएफआय ही एक मुस्लिम संघटना आहे, ज्यावर अनेक भाजप नेत्यांनी हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर दहशतवाद्यांना सोडते. समाजकंटकांसोबत त्यांचा संपर्क असतो. पण बाहेरून ते विरोध दर्शवत असल्याचं भासवतात. त्यांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे, असे आरोपही नड्डा यांनी केले तसेच आमचे सरकार दोषींवर कारवाई करेल, असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com