सावरकरांविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींना नड्डांचं खोचक उत्तर; म्हणाले, आधी स्वतःचा...: BJP Vs Rahul Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_JP Nadda

BJP Vs Rahul Gandhi: सावरकरांविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींना नड्डांचं खोचक उत्तर; म्हणाले, आधी स्वतःचा...

राजकोट : स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळं देशभरात वादंग माजलं आहे. राहुल गांधींना भाजपकडून जोरदार विरोध केला जात असून राज्यतील नेत्यांनी तर त्यांच्यावर सडकून टीकांचं सत्र सुरु केलं आहे. पण आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील या वादावरुन राहुल गांधींना खोचक उत्तर दिलं आहे. (BJP JP Nadda sharp reply to Rahul Gandhi who spoke against V D Savarkar)

हेही वाचा: Savarkar Vs Gandhi : रणजीत सावरकरांचं अस्तित्वच खोट्या प्रचारावर टिकून - तुषार गांधी

गुजरात इथं एका सभेत नड्डा बोलत होते. ते म्हणाले, मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला देईल की त्यांनी आधी स्वतःचा पक्षाची एकजूट करावी त्यानंतर देशाची. वीर सावरकरांवरील त्यांची विधानं हे सिद्ध करतं की त्यांनी देश जोडण्यासाठी नव्हे तर विभाजनासाठी 'भारत जोडो' यात्रा काढली आहे.

हेही वाचा: Savarkar issue and MVA : सावरकरांच्या मुद्द्यावरुन 'मविआ'त फूट पडणार का? जयराम रमेश यांनी स्पष्टच सांगितलं

गुजरातमध्ये भाजपनं केलेल्या विकासाची माहिती देताना नड्डा म्हणाले, "अहमदाबाद, वडोदरा, राजकोट ही राज्यातील वेगानं विकास करणाऱ्या शहरांपैकी आहेत. ही शहरं स्वतःला कचऱ्यापासून दर ठेवण्यात सक्षम आहेत"

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

दरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांवर टीका केली होती. त्यांनी इंग्रजांना माफीपत्रे लिहून स्वतःची सुटका करुन घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यात मोठा राजकीय गोंधळ पहायला मिळाला. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसेनं यावरुन रान पेटवलं तसेच राहुल गांधींवर कडाडून टीका केली. पण तरीही राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम राहत दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत सावरकरांसंबंधीची काही कागदपत्रे सादर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.