अटक करणार नाहीत तर काय मुका घेणार का? मुख्यमंत्र्यांच्या लेकीबाबत भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य I ED Inquiry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Rashtra Samithi leader Kavitha

के. कवितांबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांना प्रश्न विचारला असता त्यांनी वादग्रस्त विधान केलं.

ED Inquiry : अटक करणार नाहीत तर काय मुका घेणार का? मुख्यमंत्र्यांच्या लेकीबाबत भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

हैदराबाद : दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता यांची चौकशी सुरु आहे. आज त्या (शनिवार) ईडीसमोर हजर झाल्या आहेत.

दरम्यान, तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय (Bandi Sanjay) यांनी नुकतंच त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलंय, त्यामुळं वाद निर्माण झालाय. हे प्रकरण चिघळत असतानाच तेलंगणा भाजप (Telangana BJP) कार्यालयानं यावर स्पष्टीकरण दिलंय.

के. कवितांबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांना प्रश्न विचारला असता त्यांनी वादग्रस्त विधान केलं. कविता यांना अटक होणार का? या प्रश्नावर संजय म्हणाले, अटक करणार नाहीत तर काय चुंबन घेणार का? या त्यांच्या वक्तव्यावरुन खळबळ उडाली आहे. हा कविता यांचा अपमान असल्याचं म्हटलं जात आहे. बीआरएस कार्यकर्ते त्यांच्याविरुध्द जोरदार निदर्शने करत आहेत.

या प्रकरणावर तेलंगणातील भाजप अध्यक्षांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तेलुगू भाषेत वापरला जाणारा हा एक सामान्य वाक्प्रचार आहे. याचा अर्थ एखाद्यानं गुन्हा केला, तर तुम्ही त्याचं कौतुक कराल की शिक्षा कराल? असं नमूद केलंय.

टॅग्स :BjpTelangana