
बिहारची राजधानी पटनामध्ये प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गांधी मैदान पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर गोपाल खेमका यांना मेडिवर्सल रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांचा मृत्यू झाला. पटनाचे वरिष्ठ एसपी यांनी गोपाल खेमका यांची हत्या झाल्याची माहिती दिली.