KS Eshwarappa : '..म्हणून कर्नाटकात ऑपरेशन लोटस् अपयशी ठरलं, त्या बेशिस्त आमदारांची शेपूट छाटणार'

काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये काही आमदार आल्यापासून पक्षात बेशिस्त वाढली आहे.
KS Eshwarappa
KS Eshwarappaesakal

बंगळूर : भाजपमध्ये सध्या अनुशासनहिनता आहे. काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये काही आमदार आल्यापासून पक्षात बेशिस्त वाढली आहे. बेशिस्त असणाऱ्यांची शेपूट छाटली जाईल, असे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी म्हटले आहे.

ऑपरेशन कमळ (Operation Lotus) विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी अपयशी ठरले. काँग्रेस नेत्यांना पक्षात बोलावून आणल्याने पक्षांतर्गत अडचणीत वाढ झाली आहे, असे सांगून हुबळी येथे ईश्वरप्पा यांनी ऑपरेशन कमळवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, ‘‘भाजप पक्षात काही ठिकाणी शिस्त गेली आहे. याचे कारण काँग्रेसच्या हवेची लागण. समायोजनाच्या राजकारणावर उघडपणे चर्चा होत आहे, हे दुर्दैव आहे. चार भिंतींमध्ये बसून बोलावे, असे नाही. मी पक्षश्रेष्ठींशी उघड वक्तव्य करण्याबाबत बोलेन.

KS Eshwarappa
'गद्दारांच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण', राऊतांच्या टीकेला देसाईंचं सडेतोड उत्तर; म्हणाले, खांद्यावर बंदूक ठेऊन..

फसवणूक करून काँग्रेस राज्यात सत्तेवर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातील पाच हमी योजनांबाबतचा गोंधळ अजून दूर झालेला नाही. हमी योजना आणि केंद्र सरकारवर खोटे आरोप करून काँग्रेस सत्तेवर आली आहे.’’

KS Eshwarappa
Narayan Rane : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील; भरसभेत राणेंचं मोठं विधान

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच बेरोजगार तरुणांची फसवणूक केली. केंद्र सरकार मोफत तांदूळ देत नसल्याची त्यांनी ओरड सुरू केली आहे. मात्र, केंद्र सरकार तांदूळ देत नसल्याने ते घुबड होऊन बसले आहेत. मंत्री रमेश जारकीहोळी लाजिरवाणे वक्तव्य करीत आहेत. त्यांची काही जबाबदारी आहे का?’’

सरकारच्या हमी योजनांच्या आश्वासनाविरोधात राज्यातील जनता संतापली आहे. महिलांना गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजनांबाबत अजूनही स्पष्टता येत नाही. या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पैशाची व्यवस्था कशी होणार, हे अद्याप स्पष्ट नाही. काँग्रेस सरकारच्या या उणिवांच्या विरोधात भाजप लढणार आहे. वीज दरवाढीबाबत सरकारने खुलासा करावा. धर्मांतर कायदा आणि गोहत्या बंदी कायद्यासह आम्ही केलेले कायदे काँग्रेस मागे घेणार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

KS Eshwarappa
Anil Deshmukh : ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपनं उचलला विडा; माजी गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कार्यकर्ते निराश झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सात पथके राज्यभर फिरत आहेत. भाजप लोकसभा निवडणुकीची सर्व प्रकारे तयारी करत आहे.

-के. एस. ईश्वरप्पा, माजी मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com