esakal | भाजपच्या महिला आमदारांचे कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

kiran maheshwari main.jpg

कोरोनामुळे निधन होणाऱ्या किरण माहेश्वरी या दुसऱ्या आमदार आहेत.

भाजपच्या महिला आमदारांचे कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उदयपूर- राजस्थानमधील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. कोरोनामुळे निधन होणाऱ्या किरण माहेश्वरी या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार आहेत. यापूर्वी सहाडा येथील काँग्रेस आमदार कैलाश त्रिवेदी यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते. 

किरण माहेश्वरी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी टि्वट करुन आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. राजस्थान भाजपनेही किरण माहेश्वरी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे टि्वट केले आहे. माजी मंत्री तथा राजसमंदचे आमदार किरण माहेश्वरी यांच्या आकस्मित मृत्यूमुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबातील सदस्य, समर्थक आणि कार्यकर्त्यांना दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो. ॐ शांति, असे टि्वट राजस्थान भाजपने केले आहे. 

हेही वाचा- लसीमुळे आजारी पडल्याचा दावा करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा 100 कोटींचा दावा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजसमंदच्या आमदार किरणजी यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख होत आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सेवा आणि जनतेच्या हितांचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले आहे. त्यांच्या निधनामुळे माझे व्यक्तीगत नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास श्रीचरणी स्थान देवो, असे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा- Corona Updates: चाचण्यांच्या संख्येत तब्बल 4 लाखांनी घट; रुग्णवाढही कमी

दरम्यान, किरण माहेश्वरी या 28 ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्यांना उदयपूर येथील गीतांजली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एअरलिफ्ट करुन गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती.