
'आम्ही राम आणि हनुमानाचे भक्त आहोत. टिपूचे वंशज नाही.'
Assembly Election : श्रीरामाचं भजन गाणाऱ्यांनीच इथं रहावं, नाहीतर..; भाजप प्रदेशाध्यक्षांचा गर्भित इशारा
कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) काही महिन्यांवर येऊन ठेपलीये, त्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
कर्नाटकच्या राजकारणात टिपू सुलतान (Tipu Sultan) हा मोठा मुद्दा आहे. आता याच मुद्द्यावरुन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी इशारा दिलाय, त्यामुळं वादाची शक्यता निर्माण झालीये.
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील (Nalin Kumar Kateel) यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितलं की, 'आम्ही राम आणि हनुमानाचे भक्त आहोत. टिपूचे वंशज नाही. आम्ही टिपूच्या वंशजांना परत पाठवलंय, म्हणून मी येल्लाबुर्गाच्या लोकांना विचारतोय, की ते हनुमानाची पूजा करतील की टिपू सुलतानचं भजन गातील?'
कटील पुढं म्हणाले, 'राज्यातील जनतेनं विचार केला पाहिजे की, त्यांना राम आणि हनुमानाचे भक्त हवेत की टिपूचे वंशज. मी भगवान हनुमानाच्या भूमीतून आव्हान देतोय, टिपूवर प्रेम करणाऱ्यांनी इथं राहू नये. जे प्रभू रामाचं स्तोत्र गातात आणि हनुमानाचे समर्थक आहेत त्यांनीच इथं राहावं, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.