मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला 'तो' पुतळा सापडला; कोणी केली होती चोरी?

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा चोरीला गेला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj Statueesakal
Summary

हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला 1999 सालात पुणे शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) राज्यामधील सॅन होजे (San Jose) शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला होता. तर, या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच होता. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा चोरीला गेला होता.

दरम्यान, हा पुतळा अमेरिकेतील (America) एका कुप्रसिद्ध भंगार दुकानात हा पुतळा सापडला आहे. संतापजनक बाब म्हणजे, या पुतळ्याला फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचं वजन सुमारे 200 किलो इतकं आहे. हा पुतळा उत्तर अमेरिकेतील सॅन होजे शहराला 1999 सालात पुणे शहराकडून भेट स्वरुपात मिळाला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Mohan Bhagwat : 'त्या' काळात भोसले घराणं संघाशी संबंधित होतं; RSS प्रमुख भागवतांचं मोठं विधान

तो येथील ग्वाडालूप रिव्हर पार्कमध्ये बसवण्यात आला होता. 31 जानेवारीला या पुतळ्याची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. अखेर हा पुतळा अमेरिकेतल्या एका भंगाराच्या दुकानात सापडला. हे दुकान बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुप्रसिद्ध आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी तीन जण हा पुतळा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना दिलीये.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
PM मोदींवर डॉक्यूमेंट्री करणाऱ्या BBC कार्यालयावर Income Tax चा छापा; अमेरिका म्हणते, आता आम्ही..

त्यापैकी दोन पुरुष तर एक महिला होती. हे तिघं जण 29 जानेवारी रोजी हा पुतळा घेऊन या दुकानात आले होते. 9 फेब्रुवारी रोजी हा पुतळा या दुकानात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली आणि पुतळा हस्तगत केला. मात्र, अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नसून आरोपींचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com