esakal | पामेला-ड्रग्ज प्रकरण; भाजप नेत्यासह त्याच्या दोन मुलांना अटक

बोलून बातमी शोधा

kolkata pamela goswami drugs rakesh singh bjp}

ड्रग्ज प्रकरणी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून पूर्व बर्दमान जिल्ह्यातून मंगळवारी राकेश सिंह यांना अटक करण्यात आली. 

पामेला-ड्रग्ज प्रकरण; भाजप नेत्यासह त्याच्या दोन मुलांना अटक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून पूर्व बर्दमान जिल्ह्यातून मंगळवारी राकेश सिंह यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी राकेश सिंह यांना नोटीस जारी केली होती. मात्र तरीही राकेश सिंह हजर झाले नव्हते. भाजप युवा मार्चाची नेता पामेला गोस्वामीने कोकेन तस्करी प्रकरणात राकेश सिंह यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या दोन्ही मुलांनासुद्धा अटक केली आहे. 

राकेश सिंह यांच्या निवासस्थानी जाण्यापासून पोलिसांना रोखण्यात आलं होतं. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांपैकी राकेश सिंह हे एक मानले जातात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिंह यांचा मुलगा साहेबने दक्षिण, पश्चिम कोलकातातील वाटगुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निवासस्थानी पोलिस कर्मचाऱ्यांना आता येण्यापासून रोखले. यावेळी पोलिसांकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व कागदपत्रे दाखवली आणि कायद्यानुसार त्यांचे काम करत होते. 

भाजप युवा मोर्चाची राज्य सचिव पामेला गोस्वामीला तिचा मित्र आणि खासगी सुरक्षा रक्षकासह अटक करण्यात आली होती. 19 फेब्रुवारीला दक्षिण कोलकात्यातील न्यू अलीपूर भागात तिच्या कारमध्ये 90 ग्रॅम कोकेन आढळले होते. यानंतर पामेलाने असा आरोप केला की, राकेश सिंह यांनी हा कट रचला आहे.

हे वाचा - कोरोना विषाणूचे देशात 7 हजार वेळा म्युटेशन

कोलकाता पोलिसांनी सिंह यांना एक नोटीस पाठवली होती. याप्रकरणी कोलकाता पोलिस मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र हजर न राहता त्यांनी कामानिमित्त आपण दिल्लीला जाणार असल्याचं सांगताना 26 फेब्रुवारीला पोलिसांसमोर हजर राहू असंही म्हटलं होतं.