esakal | कोरोना विषाणूचे देशात 7 हजार वेळा म्युटेशन

बोलून बातमी शोधा

corona virus mutation

देशात कोरोनाच्या विषाणूचे सात हजारहून जास्त वेळा उत्परिवर्तन (म्यूटेशन्स) झाले असून त्यातील काही धोकादायक ठरू शकतात.

कोरोना विषाणूचे देशात 7 हजार वेळा म्युटेशन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या विषाणूचे सात हजारहून जास्त वेळा उत्परिवर्तन (म्यूटेशन्स) झाले असून त्यातील काही धोकादायक ठरू शकतात. यातील एन४४०के हा प्रकार (व्हॅरीयंट) दक्षिणेकडील राज्यांत जास्त पसरतो आहे, अशी माहिती संशोधक राकेश मिश्रा यांनी दिली आहे.

हैदराबादमधील कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सेंटर फॉर सेल्ल्यूलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) या संस्थेचे संचालक आहेत. या संस्थेत कोरोनाची जागतिक साथ सुरु झाल्यापासून उत्परिवर्तन झालेल्या पाच हजारहून जास्त प्रकारांचे व या कालावधीत त्यांची कशी उत्क्रांती झाले याचे सखोल परिक्षण झाले आहे. येथील संशोधकांच्या एका अभ्यासगटाने एक शोधनिबंधही प्रकाशित केला आहे. मिश्रा याचे सहलेखक आहे. SARS-CoV-२ जिनॉमिक्स ः भारतीय संदर्भात विषाणूच्या प्रकारांचे वर्गीकरण असे शोधनिबंधाचे नाव आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मिश्रा यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी उत्परिवर्तनानंतर व्हॅरीयंट निर्माण होतोच असे नाही. त्यामुळे वर्गीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असते. भारतात विषाणूच्या अभ्यासासाठी एका संयुक्त मंचाची स्थापना करण्यात आली आहे. अॅन इंडियन SARS-CoV-२ जिनॉमिक कन्सॉर्टिया असे त्याचे नाव आहे. यात देशभरातील दहा संस्थांचा समावेश आहे, ज्यापैकी सीसीएमबी एक आहे.

हे वाचा - आता संसदेला घेरणार, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार; राकेश टिकैत यांचा इशारा

भारतात SARS-CoV-२ विषाणूचे अद्याप पूर्ण क्षमतेनुसार वर्गीकरण नाही. देशात एक कोटी ४० लाख जिनोमची नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ सुमारे सहा हजार ४०० जिनोम प्रयोगशाळेत जमा झाले आहेत. स्थानिक पातळीवरील संसर्गानंतर जिनोमचे निरीक्षण आणि वर्गीकरण आवश्यक आहे. उत्परिवर्तनातून निर्माण होणाऱ्या विषाणूच्या प्रकारांबाबतच्या चिंतेचे निराकरण होणे गरजेचं आहे.  विषाणू व त्याच्या व्हॅरीयंटचे जीवशास्त्र आणि त्याचे परिणाम याचा आणखी सखोल अभ्यास आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.