Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं सडेतोड उत्तर; रविशंकर म्हणाले, तुमच्यासाठी वेगळा कायदा..

राहुल गांधींच्या आरोपांना रविशंकर प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
BJP leader Ravi Shankar Prasad
BJP leader Ravi Shankar Prasadesakal
Summary

देशात असा कायदा आहे की, दोन वर्षांची शिक्षा झाल्यास तुम्हाला तात्काळ अपात्र ठरवलं जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

राहुल गांधींवर (Rahul Gandhi) मानहानीचे 60 खटले सुरू आहेत. राहुल यांनी जाणूनबुजून अशी कामं केली. त्यांनी मागासलेल्यांचा अपमान केलाय, असा आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद (BJP leader Ravi Shankar Prasad) यांनी केलाय.

राहुल गांधींच्या आरोपांना रविशंकर प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिलंय. राहुल यांच्या वक्तव्याविरोधात भाजप संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. राहुल यांच्याविरुद्ध सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडं मोठ्या वकिलांची फौज होती. राज्यसभा आणि लोकसभेत मोठे वकील आहेत. राहुल यांच्या प्रकरणात ते सुरत कोर्टात का गेले नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

BJP leader Ravi Shankar Prasad
LokSabha Election : राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर वायनाड जागेची काय स्थिती, कधी होणार पोटनिवडणूक?

प्रसाद पुढं म्हणाले, "राहुल गांधींना टीका करण्याचा आणि शिव्या देण्याचा कोणताच अधिकार नाही. राहुल यांनी मागास समाजाला शिवीगाळ केलीये, अपमान केलाय. राहुल यांना चुकीचं बोलण्याचा अधिकार असेल तर मागासलेल्या लोकांनाही आहे. कोर्टानं त्यांना माफी मागण्याची संधी दिली, तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला."

BJP leader Ravi Shankar Prasad
Nitesh Rane : राहुल गांधींवर कसाबप्रमाणं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानला पाठवा; राणे खवळले

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, देशात असा कायदा आहे की, दोन वर्षांची शिक्षा झाल्यास तुम्हाला तात्काळ अपात्र ठरवलं जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळं काँग्रेस पक्षानं राहुल यांच्या प्रकरणात स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेसची कर्नाटक निवडणुकीत फायदा उठवण्याची सुनियोजित रणनीती आहे. राहुल यांना बळी दाखवा आणि काँग्रेसला वाचवा. याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. तुम्हाला दोषी ठरवल्यानंतर वकिलांच्या फौजेनं तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? देशात प्रत्येकासाठी एकच कायदा असेल तर तुमच्यासाठी वेगळा कायदा असेल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

BJP leader Ravi Shankar Prasad
Dalai Lama : दलाई लामांचा चीनला मोठा धक्का; अवघ्या 8 वर्षांच्या मंगोलियन मुलाला बनवलं 'धर्मगुरु'

रविशंकर प्रसाद म्हणाले, "आज राहुल पुन्हा एकदा खोटं बोलले. मी लंडनमध्ये काहीही चुकीचं बोललो नाही, असं म्हटलं. राहुल यांचं राजकारण अगदी सरळ आहे. आपण जिंकलो तर लोकशाही ठीक आहे आणि हरलो तर लोकशाही वाईट आहे. त्यांच्या बाजूनं निर्णय आला तर न्यायालय बरोबर आहे, त्यांच्या विरुध्द निर्णय आला तर न्यायालय वाईट आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com