भाजप नेत्याला कोरोना संसर्ग झाल्याची भीती 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 मे 2020

पात्रा यांच्या कोरोना संक्रमणाबाबतचे वृत्त म्हणजे कोरोनाने आता राजकीय नेत्यांभोवतीही विळखा घालण्यास सुरुवात केल्याचे लक्षण मानले जाते. मात्र भाजपमधून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही.

नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र पात्रा यांच्या कोरोना संक्रमणाबाबतचे वृत्त म्हणजे कोरोनाने आता राजकीय नेत्यांभोवतीही विळखा घालण्यास सुरुवात केल्याचे लक्षण मानले जाते. मात्र भाजपमधून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पात्र हे नियमितपणे भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतात त्याचप्रमाणे ते विविध वाहिन्यांवर भाजपची बाजू मांडत असतात. या निमित्ताने त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. मागच्याच आठवड्यात त्यांनी काही निवडक पत्रकारांशी गप्पांची मैफल जमवली होती. पात्र यांना आज मेदांता रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच या पत्रकारांची पाचावर धारण बसली आहे. पात्र यांना गेल्या दोन-तीन दिवसापासून खोकला आणि बारीक ताप येत होता अशी माहिती मिळाली आहे. मेदांता रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी पात्रा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Sambit Patra hospitalised after coronavirus

टॅग्स
टॉपिकस