भाजपचा माजी मंत्री नग्न अन् विद्यार्थिनी करतेय मसाज

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे.

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री नग्नावस्थेत असून, एक विद्यार्थिनी त्यांचा मसाज करत आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजपचे नेते व माजी गृहमंत्री स्वामी चिन्मयानंद यांचा नग्नावस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीने चिन्ययानंद यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, 'चिन्मयानंद यांनी एक वर्षे माझ्यावर बलात्कार केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.'

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 9 मिनिट 58 सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक 23 वर्षीय युवती नग्नावस्थेत असलेल्या नागिरकाचा मसाज करताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती चिन्मयानंद असल्याचे बोलले जात आहे. छुप्या कॅमेऱयामधून हा व्हिडिओचे शुटिंग करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये युवती व त्या व्यक्तीमध्ये चर्चा होताना दिसत आहे. चर्चा करत असताना नग्न झालेल्या व्यक्तीची मसाज करताना युवती दिसत आहे. संबंधित व्हिडिओ पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader swami chinmayanand naked video viral