पाकिस्तान-चीनसोबत युद्ध करण्याची तारीख मोदींनी ठरवलीये; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 25 October 2020

भाजप आमदार संजय यादव यांनी रविवारी हा व्हिडिओ जारी केला आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध कधी करायचंय याची तारीख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केली आहे, असं ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव असताना हे वक्तव्य आले आहे. उभय देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात ते म्हणत आहेत की, ''ज्या प्रकारे राम मंदिर आणि कलम 370 चा निर्णय घेण्यात आला, तशाच प्रकारे मोदींनी पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध कधी करायचं हेही ठरवलं आहे. कधी काय व्हायचंय याची तारीख ठरली आहे.'' सिंह यांनी 23 ऑक्टोबर रोजी बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूरमध्ये भाजप आमदाराच्या निवासस्थाळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ही टिप्पणी केल्याचे सांगितले जात आहे. 

कंगणा बसलेल्या विमानात पत्रकारांचा राडा; इंडिगोकडून पत्रकारांवर कारवाई 

भाजप आमदार संजय यादव यांनी रविवारी हा व्हिडिओ जारी केला आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी आपल्या भाषणात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस नेत्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली. यासंदर्भात भाजपचे खासदार रवींद्र कुशवाह यांना प्रतिक्रिया दिली. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सिंह यांनी तसं केले असल्याचे ते म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader swatantra dev singh controversial statement on pm modi