कंगणा बसलेल्या विमानात पत्रकारांचा राडा; इंडिगोकडून पत्रकारांवर कारवाई 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 25 October 2020

इंडिगो केवळ त्या 9 पत्रकारांवर कारवाई करुन थांबलेली नाही तर त्यांना 15 दिवसांसाठी विमानप्रवासाला बंदी घातली आहे.

मुंबई - कंगणाच्या मागील पत्रकारांचा ससेमिरा काही चुकत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून बातम्यांमध्ये असलेली कंगणाला विमानात बसल्यावरही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. मात्र यासगळ्यात वैतागलेल्या इंडिगो कंपनीकडून संबंधित पत्रकारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

इंडिगो केवळ त्या 9 पत्रकारांवर कारवाई करुन थांबलेली नाही तर त्यांना यापुढील काळात 15 दिवसांसाठी  विमानप्रवासाला बंदी घातली आहे. या पत्रकारांनी विमान प्रवासाचे सगळे नियम धाब्यावर बसवून मनमानीपणा केल्याचे हवाई प्रशासनाने म्हटले आहे. संबंधित कंपनीने हा सर्व प्रकार विमानन नियामक नागर महानिर्देशालय यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर प्रशासनाने इंडिगोला त्या पत्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पुढे इंडिगोने 9 पत्रकारांवर 15 दिवसांसाठी सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी प्रवासास बंदीची कारवाई केली आहे. ज्या विमानातुन अभिनेत्री कंगणा प्रवास करीत होती त्यातुन हे 9 पत्रकार प्रवास करीत होते. कंगणा ही चंदीगढ वरुन मुंबईला निघाली होती. यावेळी कंगणाचे फोटो, तिची प्रतिक्रिया घेण्यासाठी छायाचित्रकारांची गडबड सुरु होती.  

यासगळ्या वातावरणात आपल्याकडून सोशल डिस्टन्सचा भंग होतोय हे त्या पत्रकारांच्या लक्षात आले नाही. त्यांच्याकडून कंगणाशी बोलण्यासाठीची धडपड सुरु होती. त्यामुळे गोंधळ सुरु झाला.अशा कारणास्तव विमान प्रशासनाने कारवाई केली आहे. कंगणा 9 सप्टेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाईट नं 6E-264 या विमानातून चंदीगढ वरुन मुंबईला निघाली होती. त्या दरम्यानच्या काळात पत्रकारांकडून झालेल्या अरेरावीला तिला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indigo banned 9 media persons for bad behaviour on kangana ranaut flight