Crime: अधिकारी असल्याचे सांगून प्रवेश अन्...; ताजमहालजवळ गोळीबार करणारा भाजपचा नेता निघाला, अटक होताच म्हणतो...

Taj Mahal Firing News Update: ताजमहालजवळ गोळीबाराची घटना घडली होती. यानंतर आता त्यातील आरोपीला अटक करण्यात आले आहे. भाजप नेत्याने हे कृत्य केले आहे. याचे कारणही त्यांने सांगितले आहे.
Taj Mahal Firing BJP Leader
Taj Mahal Firing BJP LeaderESakal
Updated on

सोमवारी ताजमहालच्या पश्चिम गेट पार्किंगजवळील यलो झोन बॅरियरजवळ गोळीबार झाला. या घटनेतील आरोपी आझमगड भाजप नेते आणि एलआयसी एजंट पंकज कुमार सिंग यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी पंकज पोलिसांना चकमा देऊन पळून गेला होता. तेव्हापासून आरोपीचा शोध सुरू होता. आरोपीला लखनऊ पोलिसांनी अटक करून आग्रा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com