
जनगणनेच्या बैठकीत भाजप नेते सहभागी होणार
नवी दिल्ली - बिहारमधील नितीशकुमार सरकारने जाहीर केलेल्या जातीनिहाय जनगणनेबाबतच्या आगामी बैठकीत राज्यातील भाजप नेते सहभागी होतील, असे सांगण्यात आले आहे. येत्या १ जून रोजी होणाऱ्या या बैठकीला नितीशकुमार यांच्याबरोबर सरकारमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या एका भाजप नेत्याला सहभागी होण्यास भाजप नेतृत्वाने सांगितल्याचे समजते.
बिहारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने यापूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी भाजपचे केंद्रीय नेतृत्व अशा जातीनिहाय जनगणनेला अनुकूल नाही, असे सांगितले जात होते. त्या बैठकीतही भाजप नेते सहभागी होते. आगामी बैठकीतही भाजप नेते जातील. बिहारचे संसदीय कामकाज मंत्री व नितीशकुमार यांचे निकटवर्तीय विजय चौधरी यांनी पुन्हा दावा केला आहे ,की जातीनिहाय जनगणनेला भाजपने विरोध केलेला नाही. बिहार विधिमंडळाने दोनदा याबाबतचा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. १ जून रोजी बैठकीत जो निर्णय होईल त्यावर राज्य मंत्रिमंडळ मोहोर उमटवेल व तो प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे येईल.
Web Title: Bjp Leaders Will Participate In The Census Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..