UP Election: 44 OBC, 19 SC अन्... वाचा भाजपचे जातीय समीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Amit Shah Yogi Adityanath

UP Election: 44 OBC, 19 SC अन्... वाचा भाजपचे जातीय समीकरण

लखनऊ : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Assembly Election 2022) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. (BJP Candidate List) दरम्यान, भाजपच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार 107 विधानसभा जागांपैकी 68% जागा मागासवर्गीय, दलित आणि महिलांना देण्यात आल्या आहेत. 107 उमेदवारांपैकी 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिला उमेदवार आहेत. (UP BJP Candidate List 2022) त्याचवेळी सर्वसाधारण जागेवरून अनुसूचित जातीच्या एका उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे. उर्वरित जागांवर सवर्णांना तिकीट देण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP First Candidate List For UP) 107 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 83 पैकी 63 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर 20 उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्याचवेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आगामी विधानसभा निवडणुकीत गोरखपूर शहरातून, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबी जिल्ह्यातील सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा: Punjab: काँग्रेसची यादी जाहीर, CM चन्नी चमकौर साहिबमधून लढणार

पहिल्या दोन टप्प्यांसाठी, भाजपने दलित, महिला आणि मागासवर्गीय समुदायातील उमेदवारांना सुमारे 68 टक्के जागा देण्यात आल्या आहेत. वास्तविक, पश्चिम उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांची युती आणि पक्षाचे नेते सपामध्ये सामील होत असल्याने भाजपने जाणीवपूर्वक हे उमेदवार उभे केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top