नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर भाजपचं किती होईल नुकसान? जाणून घ्या आकडेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish-Kumar

नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले तर भाजपचं किती होईल नुकसान? जाणून घ्या आकडेवारी

भाजप आणि जेडीयु यांच्या मधील दरी पडल्याची चर्चा गेल्या महिन्या पासुन बोलल जात होत. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून नितीश कुमार भाजपपासून अलिप्त असल्याचे दिसले आणि त्यांनी विरोधी पक्षांसह जातनिहाय जनगणनेची मागणी केली. सरकार चालवण्यात मोकळीक न मिळण्यासोबतच चिरीग प्रकरणानंतर नितीश आरसीपी प्रकरणावरून भाजपवर नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांनपासुन नितीश कुमार यांनी सरकारच्या बैठकांन पासुन लांब होते. गेल्या महिन्यात मोदी यांनी घेतलेल्या कोरोना बैठकीला सुध्दा गैरहजर होते.

गेल्या काही दिवसात माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ जेवणाच्या कार्यक्रमाला आणि देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभापासून स्वतःला दूर केले. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपासून दूर राहिल्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीपासून लांबच राहिले होते. आरसीपी सिंह प्रकरणाने भाजप आणि जेडीयूमधील दरी वाढली आहे. वास्तविक जेडीयूने भ्रष्टाचार प्रकरणी आरसीपी सिंह यांना नोटीस पाठवली होती. यानंतर त्यांनी जेडीयूचा राजीनामा दिला.

आरसीपी सिंग यांच्या बहाण्याने भाजपला जेडीयूमध्ये बंडखोरी करायची होती, असा पक्षाचा आरोप आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील दरी वाढत गेली. बिहार विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 243 आहे, येथे बहुमत सिध्द करण्यासाठी 122 आमदारांची गरज लागते.

हेही वाचा: संसदेचे पावसाळी अधिवेशन चार दिवस आधीच गुंडाळले

आमदारांची संख्येवर नजर टाकली तर सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दल आहे. यांच्याकडे 79 आमदार आहेत. तसेच भाजप कडे 77 आमदार आहेत, जेडीयु चे 45 ,कॉंग्रेस 19,कम्युनिस्ट पक्षाचे कडे 12 ,एमआएम 1 ,हिंदुस्तानी आवास मोर्चा चे 4 आमदार आहेत. सध्या जेडीयूचे 45 आमदार आहेत. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी 77 आमदारांची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासुन आरजेडी आणि जेडीयू यांच्यातील जवळीकही वाढली आहे.

अशातच दोन्ही पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रीय जनता दलाचे 79 आमदार मिळून या आघाडीकडे 124 सदस्य असतील, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. याशिवाय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षही या आघाडीत सामील होऊ शकतात अस झाल्यास, युतीकडे 155 आमदार होतील, 19 काँग्रेस आमदार आणि 12 कम्युनिस्ट पक्षाचे आमदार असतील. याशिवाय त्यांना जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चाच्या अन्य चार आमदारांचाही पाठिंबा मिळू शकतो.