कर्नाटकात कंत्राटदाराची आत्महत्या, भाजपच्या मंत्र्याचं पद धोक्यात

मृत कंत्राटदाराने मृत्यूआधी सुसाइड नोटमध्ये कर्नाटकातील भाजप नेत्याचं नाव लिहलंय
political
politicalesakal
Summary

मृत कंत्राटदाराने मृत्यूआधी सुसाइड नोटमध्ये कर्नाटकातील भाजप नेत्याचं नाव लिहलंय

ग्रामविकास मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्यावर थेट आरोप केले होते. मृत कंत्राटदाराने मृत्यूआधी सुसाइड नोटमध्ये केएस इश्वरप्पा यांचं नाव लिहलं असल्यानं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, केएस इश्वरप्पा हे आत्महत्येसाठी जबाबादार असून त्यांनी ४० टक्के कमिशन मागितलं असल्याचा आरोपही या कंत्राटदारानं केला आहे.

मंगळवारी उडुपीतील एका लॉजमध्ये संतोष पाटील नावाच्या कंत्राटदाराचा मृतदेह मिळाला होता. आत्महत्येआधी पाटील यांनी यांनी काही मेसेजही पाठवले होते. मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या मृत्यूला ईश्वरप्पा जबाबदार आहेत. तसंच पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आमचे प्रिय लिंगायत नेते यांना हात जोडून विनंती आहे की माझी पत्नी आणि मुलांना मदत करा, असे या मेसेजमध्ये लिहले असल्याचे आढळून आले आहे.

political
DGCA ने 90 पायलटला बोइंग 737 मॅक्स उड्डाण करण्यापासून रोखलं

दरम्यान, या घटनेचा तपास सुरु असून पोलिसांनी संतोष पाटीलचा मृत्यू असू शकते असही म्हटलं आहे. याआधीही संतोष पाटीलने कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री केएस इश्वरप्पा यांच्याविरोधात पंतप्रधानांना पत्रही लिहिलं होतं. मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे. असा आरोप त्यात करण्यात आला होता. मागील महिन्यात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंग यांना पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये इश्वरप्पा यांच्याकडून ४० टक्के कमिशन मागितलं जात असल्याचं म्हटलं होतं. जवळपास ४ कोटी रुपयांच्या रस्ते बांधणीच्या कामाच्या कंत्राटासंदर्भात कमिशनची मागणी होत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

याप्रकरणी इश्वरप्पा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आत्महत्येबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती नाहीय. माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय पण राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मी संतोष पाटील विरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्याचा निर्णय येण्याची वाट बघावी लागेल. मी हे स्पष्ट करतो की मी काहीच चुकीचं केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

political
राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com