
Jamal Siddiqui: राम आणि कृष्ण हे पैगंबरच आहेत, त्यामुळं मुस्लिम हे रामाचे वंशज आहेत, असा दावा भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रमुखांनी केला आहे. सनातन धर्म हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि जे मुस्लिम भगवान राम आणि भगवान कृष्ण यांना मानत नाहीत त्यांना खरे मुस्लिम मानले जाऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.