काम देतो, ११ लाख दे! भाजप आमदाराची कंत्राटदाराकडे मागणी, ५ लाखांवर तडजोड; लाच घेताना अटक

BJP MLA Arrested in Bribe Case कंत्राटदाराला काम मिळवून देण्याच्या बदल्यात ११ लाखांची लाच मागणाऱ्या आणि ५ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या भाजप आमदाराला लोकायुक्तांनी अटक केलीय. आमदारासह त्याच्या स्वीय सहाय्यकांनाही ताब्यात घेतलंय.
Lokayukta Action Against BJP MLA Over Bribe Demand

Lokayukta Action Against BJP MLA Over Bribe Demand

Esakal

Updated on

एका कंत्राटदाराकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना भाजप आमदारासह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला अटक करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. कर्नाटकातील गडग जिल्ह्यात लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली. चंद्रू लमाणी असं अटक करण्यात आलेल्या आमदाराचं नाव आहे. लोकायुक्तांनी सापळा रचून आमदारासह त्यांच्या स्वीय सहाय्यकांना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी आमदाराची चौकशी केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com