BJP MLA Kalusingh Thakur Attacked in Own Village
esakal
मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील धरमपुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कालूसिंह ठाकूर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. स्वतःच्या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आहे. या हल्ल्यात आमदार ठाकूर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.