उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर, BJP आमदाराच्या हत्याकांडातील गुंडाचा खात्मा

ऑनलाइन टीम
Sunday, 9 August 2020

कोपागंज येथील रहिवासी असलेल्या राकेश पांड्येवर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल होते. 

लखनऊ : उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्याकांडातील आरोपी हनुमान पांडे उर्फ राकेश पांडेयचा खात्मा केलाय. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. लखनऊमधील  सरोजनीनगर परिसरात स्पेशल पोलिस टास्क फोर्सचे जवान आणि राकेश पांड्ये यांच्यात चकमक झाली. यात त्याचा एन्काउंटर करण्यात आला. संबंधित कुख्यात गुंड मुख्तार अंन्सारी आणि मुन्ना बजरंगी गँगशी त्याचा संबंध असल्याचेही समोर आले होते. याशिवाय कोपागंज येथील रहिवासी असलेल्या राकेश पांड्येवर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल होते. 

अयोध्येत दररोज एवढे भाविक दर्शनासाठी येतील; किती ते वाचा

मुन्ना बजरंगी याची तुरुंगात हत्या झाल्यानंतर राकेश पांड्ये हा मुख्तार अन्सारी गँगचा शूटर झाल्याची चर्चाही होती.  मुख्तारसोबतच मऊ येथील ठेकेदार अजय प्रकाश सिंह यांच्यासह 2 लोकांच्या हत्येचा आरोप ही त्याच्यावर होता. भाजपचे नेता कृष्णानंद राय हत्याकांडातही त्याचा सहभाग होता. 2005 मध्ये आमदार राहिलेल्या कृष्णानंद राय यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

29 नोव्हेंबर 2005 मध्ये करीमुद्दीनपुर परिसरतील सोनाडी गावात एका क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले हबोते. कार्यक्रमानंतर बुलेट प्रूफ कारमधून न जाता सामान्य वाहनातून जाताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर  AK 47 ने गोळीबार करण्यात आला होता. यात कृष्णानंद राय यांच्यासह 7 जणांचा जागीच ठार झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Krishnanand Rai murder case accused Hanuman Pandey killed in Lucknow encounter