Political News : "सामान्य माणसाच्या घरीही..."; छाप्यात कोट्यवधीचं घबाड सापडलेल्या BJP आमदाराचं विधान

या आमदाराच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये ६ ते ८ कोटी रुपये सापडले होते.
BJP MLA
BJP MLASakal

कर्नाटकमधले भाजपा आमदार मडल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला गेल्या आठवड्यात लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरीही कोट्यवधी रुपये सापडले. मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, त्यानंतर त्यांनी केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे.

भाजपा आमदार विरुपक्षप्पा यांच्या ऑफिसमध्ये त्यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. ८१ लाख देण्याचं निश्चित झालं होतं, त्यातले ४० लाख रुपये दिले जात होते. लाच देणाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर छापा टाकण्यात आला, त्यात हा प्रकार समोर आला. त्यानंतर विरुपक्षप्पा यांच्या घरीही छापा टाकण्यात आला, यामध्ये ६ ते ८ कोटींची रोख रक्कम सापडली होती.

BJP MLA
CBI चा छापा पडला अन् तेजस्वी यादवांना पहाटेचा शपथविधी आठवला; म्हणाले, "अजित पवार..."

आपण हे पैसे विरुपक्षप्पा यांच्या वतीने स्विकारत असल्याची कबुली त्यांच्या पुत्राने दिली. त्यानंतर ते काही काळ गायब होते. न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर सर्वांसमोर येऊन त्यांनी आपल्याकडे सापडलेले पैसे कौटुंबिक व्यवसायातून आल्याचं सांगितलं. माझ्याकडे सुपारीचं १२५ एकर शेत आहे, इतरही व्यवसाय आहेत. त्याचे पुरावे सादर करून मी माझे पैसे परत घेईन, असंही विरुपक्षप्पा म्हणाले.

सामान्य व्यक्तीच्या घरीही ४-५ कोटी सापडू शकतात, असंही विरुपक्षप्पा पुढे म्हणाले आहे. ते म्हणाले, "चन्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा व्यवसाय होतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या घरीसुद्धा ४-५ कोटी सापडू शकतात. आमचे खूप व्यवसाय आहेत. त्यामुळे ६ कोटी रुपये आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. यासंदर्भात मी योग्य ती कागदपत्रं सादर करेन."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com