भाजप नेत्याची कमालच! पूरस्थिती पहायला गेले अन् पाय भिजतील म्हणून...

पुरात अडकेलल्या नागरिकांना मदत करण्यासाठी बचावपथके कार्यरत आहेत.
ANI
ANIANI

पावसाळ्यापूर्वी पडलेल्या पावसामुळे सध्या आसामला मोठा दणका बसला आहे. धुवांधार पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं आहे. यावेळी लाखो लोकांना महापुराचा फटका बसला आहे. पुरात अडकेलल्या नागरिकांना मदत करण्यासाठी बचावपथके कार्यरत आहेत.

सध्या आसाममध्ये पुराची स्थिती बिकट असून राजकीय नेते पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेटी देत आहेत. याचवेळी भाजप आमदाराचा एक आश्चर्य करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या नेत्याने पुराच्या पाण्यातून बाहेर जाण्यासाठी चक्क बचावपथकातील एका कर्मचाऱ्याची मदत घेतली आहे. त्याच्या पाठीवर बसून भाजप नेते बोटपर्यंत आले असल्याचे दिसत आहे.

ANI
राज्यातील अनेक भागात मुसळधार, आजही पावसाचे ढग कायम राहणार

एएनआयने यासंर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे. भाजप आमदार सिबू मिश्रा हे पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेले असता गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असलेल्या भागातून ते जात असताना दिसत आहेत. यावेळी मदतकार्यातील एका जवानाच्या पाठीवर बसून पाण्यातून न जाता ते त्याच्या पाठीवरून बसुन बोटीपर्यंत गेले आहेत. त्यामुळे भाजप आमदारावर टीका सुरु आहे.

पुरामुळे आसाममधील परिस्थिती गंभीर झाली असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, होजई जिल्ह्यात अडकलेल्या २ हजारहून अधिक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. आसामला केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत कऱण्याचं आश्वासन देण्यात आलं असून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com