
कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप आमदार प्रभू चौहान यांचा मुलगा प्रतीक चौहान याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणीने बिदर महिला पोलीस ठाण्यात प्रतीक विरोधात तक्रार दाखल केली. प्रतीकने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तिनं केलाय. यानंतर प्रतीकविरोधात बलात्कार, धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.