'राहुल-प्रियांकाचा रक्षाबंधनाचा फोटो दाखवा अन् बक्षिस मिळवा'

वृत्तसंस्था
Saturday, 17 August 2019

असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला नाही. 

- विश्वास सारंग, आमदार, भाजप

भोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला नाही. 

भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार विश्वास सारंग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी यांच्यासह नेहरु गांधी कुटुंबावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप आमदार विश्वास सारंग यांनी सांगितले, की असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही. ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणताही फोटो अद्याप मी पाहिलेला नाही. जर तुमच्यापैकी कोणी असा फोटो पाहिला असेल तर तो मला दाखवा, मी तुम्हाला बक्षीस देईन. 

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राखी बांधण्यावरुन सारंग यांनी सांगितले, की काँग्रेस नेते रक्षाबंधन कधीही साजरा करत नाहीत. ते लोक इटलीची प्रथा मानतात. इटलीची प्रथा-परंपरा, संस्कृती आत्मसात करणारे सत्तेत आल्यास असेच चित्र पाहायला मिळेल, असा टोला विश्वास सारंग यांनी लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Vishwas Sarang Criticizes on Rahul and Priyanka Gandhi about Rakshabandhan