केजरीवालांचं सरकार बरखास्त होणार? भाजपनं कसली कंबर, राष्ट्रपतींना घालणार साकडं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi CM Arvind Kejriwal Gujarat tour

केजरीवालांचं सरकार बरखास्त होणार? भाजपनं कसली कंबर, राष्ट्रपतींना घालणार साकडं

नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टीचं सरकार अर्थात केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपचे आमदार राष्ट्रपतींकडे करणार आहेत. उद्या या मागणीचं निवेदनं ते राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना देणार आहेत. दिल्ली भाजपनं याबाबत ट्विट केलं आहे. (BJP MLAs will give memorandum to President tomorrow & demand dismissal of Kejriwal govt)

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंग बिधुरी यांच्या हवाल्यानं हे ट्विट करण्यात आलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, उद्या आम्ही भाजपचे सर्व आमदार राष्ट्रपतींना निवेदनं देणार असून भ्रष्टाचारी केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार आहोत.

दरम्यान, अरविंद केजरीवाल सरकारच्या मद्य धोरणांतर्गत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार लपून राहिलेला नाही. केजरीवालांनी मद्य धोरण आणत जनतेच्या कराचा पैसा वाया घालवल्याचा आरोप दिल्ली भाजपनं पत्रकार परिषदेत केला.

बिधुरी म्हणाले, "जे लोक स्टिंग ऑपरेशनद्वारे राजकारण करत होते आज त्यांचंच स्टिंग ऑपरेशन झालं आहे. ज्या लोकांना दिल्लीच्या कल्याणासाठी निवडण्यात आलं होतं त्यांनी दारु माफीयांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. दारु माफियांसोबत साटंलोटं करत केजरीवाल सरकारनं मद्य घोटाळा केला आहे. आजच्या स्टिंग ऑपरेशनवर मनिष सिसोदिया यांना उत्तर देता आलं नाही"