भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपपेक्षा काँग्रेस परवडली : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 9 सप्टेंबर 2018

भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. 

राफेल विमान खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचारासंबधित आरोप करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही यावेळी भाजपवर टीकास्त्र सोडले. आपच्या जनआधिकार यात्रेत केजरीवाल बोलत होते.

मागील पाच वर्षापूर्वी काँग्रेसचे सरकार भ्रष्टाचारी आहे म्हणून लोकांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून भारतीय जनता पक्षाला निवडून दिले. परंतु, सत्ता आल्यानंतर काँग्रेसपेक्षा मोठा भ्रष्टाचार भाजपने केला असल्याचे मत या सभेत केजरीवाल यांनी व्यक्त केले. काँग्रेसने कॉमनवेल्थ घोटाळा केला असेल तर, भाजपने त्यापेक्षा मोठा ललित मोदी घोटाळा केला आहे असे मतही केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, केजरीवाल यांनी माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांना लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी आग्रह केला आहे. यावेळी बोलताना यशवंत सिन्हा यांनी अरविंद केजरीवाल यांची स्तुती केली, तर केंद्र सरकारवर टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP More Corrupt Than Congress Says Arvind Kejriwal On Rafale Scam