esakal | काँग्रेसला जास्त चिंता भाजपची : पंतप्रधान
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

काँग्रेसला जास्त चिंता भाजपची : पंतप्रधान

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष (Congress Party) संपत चालला तरी या पक्षाला जाग येत नसून त्यांना स्वःताची नाही तर भाजपची (BJP) जास्त काळजी (Care) लागून राहिली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज विरोधी पक्षावर घणाघात केला. (BJP More Worried about Congress Prime Minister)

भाजप संसदीय पक्षाची पावसाळी अधिवेशनाची पहिली बैठक आज पार पडली. गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व भाजपचे मंत्री व खासदार त्यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना मोदी यांनी, लोकसभेत काँग्रेसने पहिले दोन दिवस कामकाज ठप्प पाडल्याबद्दल संताप व्यक्त केला. मोदी यांना काल दोन्ही सभागृहांत मंत्र्यांचा परिचय करता आला नव्हता त्याचा रोष आजच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला. सारा देश नव्हे तर संपूर्ण मानवजात कोवीडच्या संकटाशी झुंजत असताना देशातील विरोधी पक्षांचे संसदेतील वर्तन पूर्णतः बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगून मोदी म्हणाले की काँग्रेस फक्त आरोपांचे राजकारण करते.

हेही वाचा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू नाही - केंद्र सरकार

वाजपेयी यांचे दालन नड्डांना

सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांना संसदेत दालन मिळते. त्या नात्याने भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भाजपच्या संसदीय कार्यालयाशेजारील दालन मिळाले आहे. याच दालनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवानी यापूर्वी बसत असत. वाजपेयी सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर अडवानी तेथे बसत. मात्र मागील १४ वर्षांत आजतागायत भाजपने अटलजींच्या दालनावरील त्यांचा नामफलक कायम ठेवला आहे. अडवानी यांचेही नाव तसेच आहे. त्याशेजारीच नड्डा यांच्या नावाचा फलक लावण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व भाजप नेत्यांनी अगदी प्राथमिक पातळीवर आरोग्य सुविधांची सज्जता करावी. खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांत लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम चालवावी. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचेल याकडे लक्ष द्यावे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

loading image