'पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान' | Sampatiya Uikey And Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान'

नवी दिल्ली : राज्यसभेत आज बुधवारी (ता.३०) बोलताना भाजपच्या (BJP) महिला खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भगवान श्रीकृष्णाशी केली. ते आजच्या युगातील कृष्ण भगवान असून तेही १६ कलांनी संपन्न आहेत. यावर राज्यसभेचे (Rajya Sabha) उपसभापती हरिवंश यांनी खासदारांना विधेयकावर बोलण्याची विनंती केली. राज्यघटना (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) आदेश (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना खासदार संपतिया उईके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) तुलना भगवान श्रीकृष्णाशी (Lord Krishna) केली. देशात अनेक पंतप्रधान झाले. त्यांनी देशाच्या कल्याणासाठी काम केले. पण ते फक्त भारतापुरते सीमित राहिले आहेत. (BJP MP Compare PM Narendra Modi To Lord Krishna In Rajya Sabha)

मात्र पंतप्रधान मोदींमध्ये राष्ट्र व विश्व कल्याणाची भावना आहे. आपल्यातला स्वार्थ बाजूला ठेवून ते देश आणि जगासाठी काम करत असल्याने मोदींना जागतिक नेता म्हटले जाते, असे उईके म्हणाल्या. अमेरिका, रशिया किंवा पाकिस्तान असो, सर्वत्र मोदींचे कौतुक केले जात आहे. मोदी या युगातील कृष्ण भगवान असून त्यांच्याकडेही १६ कला आहेत. खासदार येथेच थांबल्या नाहीत.

त्यांनी मोदींच्या 'सबक साथ, सबका विश्वास, सबका विकास, सबका प्रयास' या घोषवाक्याची तुलना थेट प्राचीन भारतीय सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी केली. मौर्य यांनी अखंड भारत निर्माण केला होता. तेच कार्य मोदी करत असल्याचा दावा त्यांनी केला. उपसभापती हरिवंश यांनी उईके यांना विधेयकावर बोलण्याचे आवाहन केले.