मोहम्मद जिनानं स्वातंत्र्यापूर्वी देश उद्ध्वस्त केला, ओवैसीही तेच करत आहेत; भाजपचा हल्लाबोल I Asaduddin Owaisi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

'जिनान स्वातंत्र्यापूर्वी देश उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं, तेच काम स्वातंत्र्यानंतर ओवैसी करत आहेत.'

'मोहम्मद जिनानं स्वातंत्र्यापूर्वी देश उद्ध्वस्त केला, ओवैसीही तेच करत आहेत'

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी आज (बुधवार) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांच्याशी तुलना केलीय. ते म्हणाले, जिनांनी स्वातंत्र्यापूर्वी देश उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं, तेच काम स्वातंत्र्यानंतर ओवैसी करत आहेत. देशाला उद्ध्वस्त करण्याचं जे काम जिना यांनी स्वातंत्र्यापूर्वी नियोजित पद्धतीनं केलं होतं, तेच काम ओवैसी करत असून भारतातील जनता त्यांची वृत्ती खपवून घेणार नाही, असा इशारा यादव यांनी दिलाय.

मुस्लीम समाजाला (Muslim Community) सावध करत भाजप खासदार (BJP MP) यादव म्हणाले, ओवैसी मुस्लीम समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळं आपल्या देशाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याआधी मंगळवारी ओवैसींनी महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीसाठी मुघलांना जबाबदार धरत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता.

हेही वाचा: सैनिकांवर गोळीबार ते गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण; जाणून घ्या यासिनचं दहशतवादी कृत्य

मुघलांशी भारतीय मुस्लिमांचा कोणताही संबंध नाही, पण मुघल सम्राटांच्या बायका कोण होत्या? असा प्रश्न एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केला आहे. औवेसी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून हा सवाल विचारला. ज्ञानवापी मशिद आणि कुतूब मिनार वरुन सुरू असलेल्या वादावर औवेसी यांनी हे वक्तव्य केलंय. औवेसी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, मुघलांचा आणि भारतीय मुस्लिमांचा काही संबंध नाही. पण, हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या? औवेसी यांच्या या पोस्टनंतर आता वाद होण्याची शक्यता आहे.

Web Title: Bjp Mp Compares Asaduddin Owaisi With Jinnah Says Aimim Chief Is Hell Bent On Destroying Country Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top